: आपण सुरुवातीपासून महामारीविरोधात आघाडीवर राहून लढत आहात. आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून येताना ही लढाई निकराने व शर्थीने लढण्याची गरज आहे. सर्वांच्या प्रयत्नांतून एक दिवस या महामारीवर आपण निश्चितपणे मात करू, असा विश्वास अमरावती जिल्हा डॉ. यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे. ( )

वाचा:

आरोग्य अधिकारी, कर्मचारी, गटप्रवर्तिका अर्थात आशाताई या कोविड योद्ध्यांना उद्देशून लिहिलेल्या भावनिक पत्रात डॉ. दिलीप रणमले यांनी या सर्वांच्या आतापर्यंतच्या अविरत श्रमांबद्दल आदर व्यक्त केला आहे. रुग्णसेवेहून दुसरे मोठे कार्य नाही. सैन्य जसे सीमेवर लढून देशाचे रक्षण करते, तसे आपण समाजातील अर्भकांपासून वृद्धांपर्यंत त्यांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून लढत आहात, अशा शब्दांत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य कर्मचारी व ‘आशाताईं’चा गौरव केला आहे.

वाचा:

बाधितांची वाढती संख्या पाहता आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे ही लढाई शर्थीने लढणे आवश्यक आहे. प्रत्येकजण आपल्याकडे आशेचे किरण म्हणून पाहतो आहे. त्यामुळे त्यांच्या निरोगी जीवनासाठी त्यांच्या मनावर दक्षता त्रिसूत्री बिंबवणे, ती जीवनशैलीचा भाग होण्यासाठी ती सतत सांगत रहाणे आवश्यक आहे. लक्षणे आढळलेल्यांना तपासणीसाठी पाठविणे आणि पॉझिटिव्ह आलेल्यांना उपचार मिळवून देत संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या करून घेणे यासाठी तालुका कार्यालयांना वेळोवेळी माहिती देणे आवश्यक आहे. हे काम ‘आशाताईं’कडून होत असल्याने त्यांचा या लढाईतील योगदान मोलाचे आहे. पुढील लढाईही आम्ही शर्थीने आणि एकजुटीने लढू व एक दिवस करोनावर निश्चित मात करू, असे रणमले यांनी पत्रात पुढे नमूद केले आहे.

वाचा:

‘हम उस माटी के वृक्ष नही जिसको नदीयों ने सिंचा है, बंजर माटी में पलकर भी हमने मृत्यूसे जीवन खिंचा है, मिटनेवाला नाम नहीं हमारा, एक दिन जरूर महामारीसे जितेंगे,’ असा निर्धार व्यक्त करत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या सर्वांना करोना लढाईत एकजुटीने लढण्याचे आवाहन केले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here