म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे आणि अशा एक नव्हे तर दोन मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी त्यांना अभय दिले. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर कोणतीही चौकशी होण्याआधीच त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदावरून दूर हटविले. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तसेच आमदारांमध्ये आता उघड नाराजी व्यक्त होत आहे.

वाचा:

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. त्यानंतर या महिलेने पोलिसांकडे दिलेली तक्रारही मागे घेतली होती. मात्र, या प्रकरणात मुंडे यांचे दुसरे लग्न, त्यापासून असलेली अपत्ये या सर्व गोष्टी बाहेर आल्या होत्या. त्यामुळे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून एक तर मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता अथवा पक्षाकडून त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र, पवार यांनी सुरुवातीला हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले असले तरी नंतर सोयीस्करपणे कानाडोळा केला. अलीकडेच पोलिस आयुक्तपदावरून दूर हटविण्यात आलेले आयपीएस अधिकारी परमबीरसिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच बार, पब, हॉटेल यांच्याकडून १०० कोटी रुपयांचा निधी जमविण्याबाबतचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतरही देशमुख यांचा राजीनामा न घेता त्यांना अभय देण्यात आले आहे. विशेष म्हणजे देशमुख यांच्या बचावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची फौजही मैदानात उतरली होती.

शिवसेनेचे खच्चीकरण?

‘राष्ट्रवादी’च्या मंत्र्यांना अभय मिळत असताना राठोड यांचा ज्या प्रकारे राजीनामा स्वीकारण्यात आला त्यावरून आता शिवसेनेमध्येही उघड नाराजी व्यक्त होत आहे. कोणत्याही महिलेवरील अत्याचार गंभीरच असून, संबंधितांवर कारवाई व्हायलाच पाहिजे. मात्र, ते करताना संबंधिताला त्याची बाजू मांडण्याची, त्याच्यावर झालेले आरोप सिद्ध होत नाहीत तोवर संरक्षण मिळण्याची गरज असते. राठोड यांच्याबाबत असे काहीही न होता थेट राजीनामा देण्याची वेळ आणली हे योग्य नसल्याचे मत आता शिवसेनेचे नेते आणि आमदार खासगीत व्यक्त करीत आहेत.

चौकशी अपेक्षित

जर विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री ठाकरे बळी पडणार असतील तर, काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’ वाढत राहील, मात्र शिवसेनेचे खच्चीकरण होत जाईल असे मतही शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्याने बंजारा समाजाची विनाकारण पक्षाने नाराजी ओढवून घेतली, असेही या नेत्याने सांगितले. राठोड यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांची चौकशी जाहीर करून त्याबाबतच्या अहवालानंतर त्यांच्यावर कारवाई करणे योग्य ठरले असते, असेही या नेत्याने सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here