स्फोटके सापडलेली कार चोरी झाल्याची तक्रार कारचे मालक मालक यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल करून विक्रोळी पोलिस तपास करीत असतानाच यांनी फोन करून तपास थांबविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अँटिलिया स्फोटके प्रकरणाचा तपास आमच्याकडे असल्याने असल्याने कारचोरीचाही तपास आम्ही करू, असा फोन २७ फेब्रुवारीला वाझे यांनी विक्रोळी पोलिसांना केला होता.
वाचा:
आणि मनसुख हिरन मृत्यूप्रकरणात दिवसागणिक सचिन वाझे यांचे नवनवीन कारनामे पुढे येत आहेत. एका प्रकरणाचा तपास एनआयए करीत असून मृत्यूप्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे. दोन्ही यंत्रणांच्या तपासामध्ये गेल्या महिना-दोन महिन्यापासून कशाप्रकारे हा कट रचण्यात आला होता, याचा हळूहळू खुलासा होत आहे. विक्रोळी पोलिस ठाण्यात कारचोरीची तक्रार केल्यानंतर मनसुख आणि त्यांचा भाऊ विनोद यांच्यामध्ये संभाषण झाले होते. यामध्ये विनोदने मनसुख यांना सचिन वाझे कार वापरत होते, असे पोलिसांना सांगितले का? असे विचारत आहेत. यावर मनसुख यांनी नाही सांगितले असे उत्तर देतानाच वाझे म्हणाले हे सर्व प्रकरण माझ्याकडे येणार आहे, काळजी करू नका. दोन्ही भावांमध्ये संदेशाच्या माध्यमातून झालेले संभाषण आणि मनसुख यांचे वाझेंसोबतचे व्हॉट्सअप कॉल याआधारे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मनसुखच्या हत्येमध्ये नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोघांचा सहभाग असल्याचे शोधून काढले.
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ २५ फेब्रुवारीला जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. त्याच रात्री या प्रकरणाचा तपास सचिन वाझे यांच्या सीआययूकडे देण्यात आला. २७ फेब्रुवारीला वाझे यांनी विक्रोळी पोलिसांना फोन करून कारचोरीही याच प्रकरणाशी निगडित असल्याने तुम्ही तपास थांबवा असे विक्रोळी पोलिसांना सांगितले होते. वाझे यांची पोलिस आयुक्तांशी असलेली जवळीक पाहता विक्रोळी पोलिसांनी त्यांनी सांगताच कारचोरीच्या गुन्ह्याचा तपास थांबवल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मनसुख यांना कांदिवली युनिटमधून तावडे नावाच्या अधिकाऱ्याचा फोन आला होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. हा फोन विनायक शिंदे, सचिन वाझे की अन्य कुणी केला होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
एनआयएचे पथक हॉटेल ट्रायडंटमध्ये
सचिन वाझे यांचे गेले काही दिवस ठाण्यातील घरापेक्षा हॉटेल ट्रायडंटमध्ये अधिक वास्तव्य असायचे. या हॉटेलमध्ये वाझे यांनी एक खोलीच आरक्षित केली होती. तपासादरम्यान ही माहिती पुढे आल्यानंतर सोमवारी एनआयएचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी वाझे राहत असलेल्या खोलीतून काही कागदपत्रे तसेच हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. यामध्ये सचिन वाझे अनेकदा मोठ्या बॅगा घेऊन आतबाहेर करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राजकीय नेते दिसल्याची माहिती आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times