करोना संसर्गाच्या काळामध्ये मधुमेहाच्या नव्या रुग्णांची नोंद मोठ्या प्रमाणात झाली नसली तरीही असलेल्यांनी पुरेशी काळजी न घेतल्यामुळे वाढल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या लक्षणांकडे योग्यवेळी लक्ष दिले नाही तर हा त्रास बळावू शकतो, याकडे वैद्यकीय तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.
डायबेटॉलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले की, करोना संसर्गाच्या काळामध्ये अनेक रुग्णांनी योग्य पद्धतीचे वैद्यकीय नियोजन सांभाळले नाही. अतिखाणे, बैठी कामे, व्यायामाचा अभाव या कारणांमुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. हा आजार प्रत्येक आठवड्याला रुग्णाने डॉक्टरांची भेट घ्यावी असा नाही, मात्र त्यांना दिलेले वैद्यकीय निर्देश योग्य प्रकारे पाळले गेले नाही तर वाढलेल्या वजनामुळे मधुमेहाचा त्रास असलेल्यांना अधिक त्रास होऊ शकतो, असेही डॉ. गाडगे म्हणाले.
मागील अनेक वर्षांपासून असलेल्या विश्वास कोदे यांनी सांगितले की, करोना काळापूर्वी त्यांचा आहार, व्यायाम यामध्ये नियमितता होती. मात्र संसर्गाच्या भीतीने बाहेर जाण्याचाही ताण येत होता, खाण्याचीही पथ्ये योग्य प्रकारे पाळण्यात आली नाहीत. काही रुग्णांनी मधुमेह व्यवस्थापनासाठी लागणारी औषधे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विकत घेता आली नाहीत, असेही सांगितले. या सर्वाचा परिणाम रुग्णांच्या प्रकृतीवर झाल्याचे डायबेटॉलॉजिस्ट डॉ. रोशना तिवारी यांनी सांगितले. रक्तातील शर्करा वाढण्याच्या तक्रारी महिलांमध्ये अधिक दिसून आल्या. काही जणांना कोविडची बाधा झाली होती, त्यांच्यामध्ये अचानक रक्तातील साखर वाढण्याचा त्रासही सुरू झाला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times