वाचा:
सचिन वाझे प्रकरणावर संसदेत आवाज उठवल्यामुळं शिवसेनेचे खासदार यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप अमरावतीच्या अपक्ष खासदार यांनी केला आहे. राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेलं तक्रारीचं पत्र ट्वीट करून चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागली आहे. ‘व्वा रे बहाद्दर… महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय? विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. धमक्या कसल्या देताय,’ असं वाघ यांनी अरविंद सावंत यांना सुनावलं आहे. ‘आम्ही जिजाऊ, सावित्रीच्या लेकी आहोत, तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, असंही वाघ यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
वाचा:
वाघ यांच्या या ट्वीटला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या नावाचा वापर करून तुम्ही ज्यांना पाठीशी घालत आहात, त्यांना एकच प्रश्न विचारा की तुम्ही गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या हक्काचा GST निधी मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले? महाराष्ट्रात राहून शासनाधिकृत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न करता अनधिकृत अशा PM Care Fund ला मदत करणं यापेक्षा मोठा महाराष्ट्रद्रोह होऊच शकत नाही. हिशोब मागूनही जे पीएम केअर फंडाचा हिशेब द्यायला तयार नाहीत त्यांना जाब विचारा,’ असं चाकणकर यांनी वाघ यांना सुनावलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times