मूळचा राजस्थानचा असल्याचा ३८ वर्षीय ब्रिटीश नागरिकत्व असलेल्या किशन सिंहला ब्रिटन पोलिसांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. त्याला हिथ्रो विमानतळावरून भारतीय हवाई दलाच्या एका विमानातून रविवारी नवी दिल्लीत आणण्यात आले. किशन सिंहवर वर्ष २०१६-१७ मध्ये मेफेड्रोन आणि केटामाइन सारखे अंमली पदार्थ भारतात पाठवण्याचा आरोप आहे. तिहार तुरुंगात असणारी प्रतिकूल परिस्थिती आणि मानवाधिकाराच्या मुद्यावर किशन सिंहने आपल्या प्रत्यार्पणाला विरोध केला होता. किशन सिंहला भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय मे २०१९ मध्ये जिल्हा न्यायालयाने दिला होता.
वाचा:
वाचा:
ब्रिटनने भारताला हवे असलेले आरोपी सुपूर्द करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी क्रिकेट सट्टेबाज संजीव चावलाला मागील वर्षी फेब्रुवारीत भारताकडे सुपूर्द करण्यात आले होते. भारताने फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचे प्रत्यार्पण करण्याची मागणी ब्रिटनकडे केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times