मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणीने आपल्या बापाला एका हॉटेलात जेवायला घातला. तिथे त्याला दारू पाजली. दारूच्या नशेत असलेल्या बापाला तरुणीने जिवंत पेटवून दिले. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी आपल्या वडिलांसोबत रविवारी एका हॉटेलात जेवायला गेली होती. तिथे तिने त्याला दारू पाजली. त्यानंतर ते स्ट्रॅड रोडवर फिरायला गेले. हुगली नदीच्या काठावरील एका बाकावर वडील दारूच्या नशेत झोपी गेले. तेथे तिने त्याच्यावर रॉकेल ओतले आणि जिवंत पेटवून दिले, अशी कबुली तरुणीने दिली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तरुणीच्या काकाने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
बापाकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचा आरोपी तरुणीचा दावा
तरुणीची चौकशी केली असता, तिने धक्कादायक आरोप केले आहेत. ती लहान असतानाच, आईचे निधन झाले होते. त्यानंतर बापाने लैंगिक शोषण केले. तिचे लग्न झाल्यानंतर अत्याचार थांबले. मात्र, ती पतीपासून विभक्त झाल्यानंतर ती पुन्हा माहेरी परतली. त्यानंतर बापाने पुन्हा अत्याचार करण्यास सुरूवात केली, असा आरोप तिने केला आहे. तरुणीने केलेला दावा खरा आहे की खोटा याची पडताळणी करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले. तरुणीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times