मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही माहिती दिली. ‘पोलीस दलातील गैरप्रकार व बदल्यांच्या रॅकेटबद्दल तक्रार करणारे परमबीर सिंग हे पहिले अधिकारी नाहीत. त्याआधीच्या पोलीस महासंचालकांनीही पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटच्या संदर्भात एक अहवाल राज्य सरकारला दिला होता. माझ्याकडं त्यावेळच्या गुप्त अहवालाची प्रत आहे. याशिवाय, ६.३ जीबीचा डेटा आहे. त्यात सर्व प्रकारच्या संभाषणाचा पुरावा आहे,’ असं फडणवीस म्हणाले.
वाचा:
‘बदल्यांच्या रॅकेटची संपूर्ण माहिती सुरुवातीला पोलीस महासंचालकांना देण्यात आली होती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी ती अतिरिक्त गृह सचिवांकडे पाठवली. मुख्यमंत्री यांना देखील ही सगळी माहिती देण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं या गंभीर व संवेदनशील प्रकरणाकडं पूर्ण दुर्लक्ष केलं. उलट त्यांनी गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांचीच बदली करून टाकली. शिवाय, रॅकेटमध्ये नावं असलेल्यांना त्याच जागी पोस्टिंग देण्यात आली,’ असा आरोप फडणवीस यांनी केला. ‘ही सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना देणार आहेत. यात आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांसह काही राजकीय नेत्यांचाही समावेश असल्यानं याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहे,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times