म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: संघधार्जिणे राज्यपाल यांच्या उपस्थितीत होणारा दीक्षांत समारंभ रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. पुरोगामी विचाराच्या विद्यापीठात होणाऱ्या समारंभावर विद्यार्थ्यांनी बहिष्कार घालण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. पुण्यात तुषार गांधी यांचा कार्यक्रम राजकीय दबावातून रद्द झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधने आक्रमक भूमिका घेतली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६० वा दीक्षांत समारंभ मंगळवारी (११ फेब्रुवारी) आहे. हा दीक्षांत समारंभ वादात सापडण्याची शक्यता आहे. संघधार्जिण्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणारा दीक्षांत समारंभ रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेल्या राज्यपालांना निमंत्रित करुन प्रशासनाने मोठा अवमान केला आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात होणारा ‘रिव्हीजिटींग गांधी’ कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या दबावाला बळी पडून हा कार्यक्रम रद्द झाल्याचा आरोप ‘राविकाँ’चे कार्याध्यक्ष अमोल दांडगे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला आहे.

ही घटना ताजी असतानाच पुरोगामी विचाराच्या विद्यापीठात संघसेवक कुलपती बोलावण्याची गरज नाही. दीक्षांत समारंभ तात्काळ रद्द करावा. अन्यथा, होणाऱ्या परिणामास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असे दांडगे यांनी नमूद केले आहे. पोलीस आयुक्त आणि विद्यापीठ प्रशासनाला निवेदन देऊन दीक्षांत समारंभ रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

275 COMMENTS

  1. india online pharmacy [url=http://pharmacyindia.pro/#]indian pharmacy paypal[/url] cheapest online pharmacy india

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here