स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल यांनी ‘मटा ऑनलाइन’शी बोलताना दिली. त्यामुळं स्थानिक स्तरावर का होईना पण महाविकास आघाडीमध्ये संघर्षाची चिन्हे दिसत आहेत.
वाचा:
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांत आघाडीचा धर्म पाळत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राष्ट्रवादीला मदत केली होती, मात्र आता राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळं स्वाभिमानीनं महाविकास आघाडीच्या विरोधात पावलं टाकायला सुरुवात केली आहे. रविवारी अजित पवार यांच्या दौऱ्या दरम्यानही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निदर्शने केली होती.
याबाबत राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘मी सध्या दिल्लीत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. याबाबत कार्यकर्त्यांचा कौल घेऊन दोन दिवसांत निर्णय घेऊ.’
वाचा: वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times