या प्रकरणात अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिव वाझे यांच्या कार्यालयातील रजिस्टरही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे. यात आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आहेत. २५ फेब्रुवारी रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळील रस्त्यालगत कार पार्क करण्यात आली होती. या कारमध्ये स्फोटके आढळली होती. तसेच मुंकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणारे पत्रही सापडले होते. या प्रकरणाचा तपास एनआयएकडून करण्यात येत आहे.
कारमध्ये सापडलेल्या पत्रात मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता अंबानी आणि मुलाला धमकी देण्यात आली होती. हा फक्त ट्रेलर आहे, असेही त्यात म्हटले होते. दरम्यान, या प्रकरणात लखनभैया चकमक प्रकरणातील आरोपी निलंबित कॉन्टेबल विनायक शिंदे याच्यासह एका बुकीला अटक करण्यात आली होती. एनआयए पथकाने सोमवारी दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात जाऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी वाझे बराच वेळ राहिले होते, असे सूत्रांकडून समजते. वाझे हे सध्या एनआयएच्या कोठडीत आहेत. अंबानींच्या घराजवळ पार्क केलेल्या कारमध्ये स्फोटके ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दुसरीकडे, राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने सोमवारी गुजरातमधील कछ येथून एका व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. त्याने गोर याला १४ सिमकार्ड पुरवल्याचा आरोप आहे. ठाण्यातील मनसुख हिरन यांच्या मृत्यू प्रकरणात ही अटक झाली होती. त्याने गोर याला हे सिमकार्ड दिले होते. गोर याने ते शिंदे यांना दिले होते अशी माहिती आहे. त्याचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे, अशी माहिती एटीएसकडून देण्यात आली.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times