मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आणि आई-बाबा झाले आहेत. त्यानंतर ते आपल्या मुलाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अमृता आणि अनमोल यांनी आपल्या बाळासाठी नॅनी ठेवलेली नाही. ते दोघं मिळून त्याची काळजी घेतात. अशात आता अनमोलनं सोशल मीडियावर शेअर केलेला अमृताचा फोटो चर्चेत आला आहे. हा फोटो शेअर करताना अनमोलनं हा फोटो खरा आणि जादुई असल्याचं म्हटलं आहे. या फोटोमध्ये अमृता व्हाइट टॉप आणि ब्लू जीन्समध्ये दिसत आहे. पाठमोऱ्या बसलेल्या अमृताच्या कुशीत तिचा मुलगा आहे.
आर जे अनमोलनं हा फोटो शेअर करताना लिहिलं, ‘वीरला दूध पाजणाऱ्या अमृताला पाहणं माझी आवडती गोष्ट आहे. हे खूपच वेगळं पण तेवढंच जादुई सुद्धा आहे आणि खूप पवित्र सुद्धा. हे खूपच कठीण काम आहे. पूर्ण रात्र, पूर्ण दिवस, आणि असं करताना तिच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. आई आणि मुलाचा मी खूपच सुंदर बॉन्ड पाहिला आहे. तुला मी सॅल्यूट करतो. मी माझ्या आईला सॅल्यूट करतो आणि या जगात असलेल्या सर्व आईंना सुद्धा. यासाठी मदर्स डेची वाट का पाहावी.’
आर जे अनमोलची ही सुंदर पोस्ट आणि त्याचे विचार याचं सर्वच चाहते कौतुक करताना दिसत आहेत. अनमोलच्या अगोदर अमृतानंही काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यात तो आपल्या मुलाची काळजी घेताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये अनमोल वीरला मालिश करताना, त्याला अंघोळ घालताना आणि झोपवताना दिसला होता.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times