मुंबई: महाराष्ट्रातील सचिन वाझे प्रकरण संसदेत उपस्थित करणाऱ्या अमरावतीच्या खासदार चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहत शिवसेना खासदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संसदेत सचिन वाझे प्रकरण उचलून धरल्यानंतर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकी दिली. महाराष्ट्रात तू कशी फिरते ते बघतोच. तुलाही तुरुंगात डांबू, अशी धमकी अरविंद सावंत यांनी दिल्याचं नवनीत राणा यांनी पत्रात म्हटंलं आहे.

मुंबईतील मनसुख हिरन मृत्युप्रकरणी सचिन वाझे ( ) आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( parambir singh ) यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आपण लोकसभेत प्रश्न उपस्थित केले. यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीमध्ये धमकावलं. यापूर्वीही आपल्याला शिवसेनेच्या लेटरहेडवरून आणि फोनवरून अॅसिड हल्ल्यासह जिवे मारण्याची धमकावण्यात आलं आहे, असं राणा यांनी पत्रात म्हटलं आहे. तसंच, या प्रकरणी पोलीस कारवाईची मागणी त्यांनी पंतप्रधान व अमित शहा यांच्याकडे केली आहे.

अरविंद सावंत यांनी फेटाळले आरोप

नवनीत राणा यांनी केलेले आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी फेटाळून लावले आहेत. नवनीत राणा या एक महिला आहेत आणि आपल्याला भेटल्यावर त्या नेहमी दादा-भैया म्हणत असतात. महिलांना धमकावण्याचं काम शिवसेना करत नाही. मी त्यांना धमकावलं आहे हे त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी सांगावं. पण त्यांची चर्चा करण्याची पद्धत आहे ती योग्य नाहीए, असं अरविंद सावंत म्हणाले. तुम्ही नवनीत राणा यांचे आधीचे व्हिडिओ पाहू शकता. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत असतात. पण चर्चा करताना त्यांची बॉडी लँग्वेज बघा, अतिशय घृणास्पद आहे. तरीही आम्ही काहीही बोलत नाही. त्यांनी यापूर्वीही असा दावा केला आहे आणि आजही तेच म्हणत आहेत. मी त्यांना का धमकी देऊ? त्या योग्य पद्धतीने बोलत नाहीएत. ते ठीक नाही, असं अरविंद सावंत म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here