मुंबई: यांच्या पत्रप्रपंचानंतर राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेक गौप्यस्फोट केले आहेत. सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यात किती मधुर संबंध होते हे राष्ट्रवादीनं उदाहरणासह सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री यांनी आज परमबीर सिंग यांच्या आरोपातील फोलपणा उघडकीस आणला. ‘सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून कुठलाही आदेश नव्हता. परमबीर सिंग यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या समितीनं याबाबतचा निर्णय घेतला होता. त्याची पोस्टिंगही परमबीर सिंग यांच्या अधिकारातच करण्यात आली. एवढंच नव्हे, सचिन वाझे याच्याशी परमबीर यांचे अत्यंत उत्तम संबंध होते. वाझेला अटक होणार हे कळताच आदल्या रात्री परमबीर सिंग हे पोलीस मुख्यालयात तीन तास बंद दरवाजाआड त्याच्याशी चर्चा करत होते. ही माहिती मुंबई पोलिसांतील प्रत्येक अधिकाऱ्याला होती,’ असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

वाचा:

‘टीआरपी घोटाळ्यात सुरुवातीला परमबीर सिंग प्रचंड सक्रिय होते. पण गेले दोन-तीन महिने थंड होते. त्यांच्यावर कुठला दबाव होता माहीत नाही. १७ तारखेला आपली बदली होणार हे कळताच १६ तारखेला त्यांनी व्हॉट्सअॅपवरून पुरावे तयार केले. त्यांनी पहिला आरोप गृहमंत्र्यांनी टार्गेट दिल्याचा केला होता. मात्र, तो खोटा आहे. सनसनाटी निर्माण करण्यासाठीच त्यांनी हे केलं होतं,’ असं मलिक म्हणाले.

‘डेलकर प्रकरणात जबरदस्तीनं गुन्हा नोंदवण्यास सांगितलं गेलं. भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा गृहमंत्र्यांचा प्रयत्न होता, असा आरोपही परमबीर यांनी केला होता. त्यावरही मलिक यांनी खुलासा केला. ‘मुंबईत आत्महत्या झाली असेल तर गुन्हा मुंबईत दाखल होणार की दादरा-नगर हवेलीमध्ये? याचं उत्तर आम्हाला जनतेकडूनच अपेक्षित आहे. सुसाइड नोटमध्ये दादरा-नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा यांचं नाव होतं. या प्रकरणात परमबीर सिंग यांनी जबाबदार अधिकारी म्हणून कायद्यानं कारवाई करायला हवी होती. मात्र, केवळ भाजपची सहानुभूती मिळेल यासाठी व स्वत:च्या बचावासाठी त्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप केले,’ असं मलिक यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी वा गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांची पाठराखण केल्याचा विरोधकांचा आरोपही मलिक यांनी खोडून काढला. ‘अँटिलिया समोर स्फोटके आढळल्याचं प्रकरण अत्यंत गंभीर आहे. हे सगळं कोणाच्या सांगण्यावरून झालं त्याचा तपास एनआयए आणि एटीएस करत आहे. मात्र, कुठलेही सरकार सुरुवातीला अधिकाऱ्यांची पाठराखण करते. पण सत्य समोर आल्यानंतर कारवाईच्या आड येत नाही. वाझेबद्दल सगळी माहिती समोर आल्यानंतर त्याची पाठराखण करण्याचं काम सरकारनं केलं नाही,’ असं मलिक म्हणाले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here