वाचा:
ते मंगळवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. कधी केलं जातं याचे काही नियम आहेत. हे टॅपिंग कोणाच्या परवानगीने झाले, रश्मी शुक्ला यांना परवानगी कोणी दिली? त्याबाबत राज्य गुप्त वार्ता विभाग यांना याचे अधिकार असतात. रश्मी शुक्ला या आयुक्त असताना त्यांनी माहिती कशी गोळा केली? त्यांना भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून काम कसे करावे लागले? हे सर्व समोर आले आहे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी यंत्रणेचा गैरवापर कसा केला हे सर्व उघड झाले आहे. याकडं लक्ष देण्याची गरज आहे. जे काही आरोप झालेत ते सर्वांसमोर येतील. आज पुन्हा प्रेस घेऊन या गोष्टी सतत मीडियात देण्याचे काम विरोधी पक्ष नेते करत आहेत. त्यांनी आज केलेले सर्व आरोप खोटे आहेत. या सर्व बदल्या बोर्डच्या माध्यमातूनच झाल्या आहेत. कोणीतरी या बदल्या अपारदर्शी झाल्या असे सांगत आहेत, मात्र या बदल्या नियमानेच झाल्या आहेत, असं पाटील म्हणाले.
वाचा:
‘फडणवीस गृहमंत्री असताना नियम डावलून किती बदल्या करण्यात आल्या हे उघड होणं गरजेचं आहे. फोन टॅपिंग ही गंभीर बाब आहे. आकसापोटी त्यांनी धादांत खोटे आरोप केले आहेत. या आरोपांना राज्यातील जनता भीक घालणार नाही. मनसुख हिरन हत्या, जिलेटीन कांड्या यांचा तपास होणे गरजेचे होते,’ असंही ते म्हणाले.
‘हिरन हत्येबाबत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलवले जाणार होते. तोपर्यंत एनआयए मध्ये आली. एटीएसने खूप चांगला तपास केला होता. आणखी चार दिवसांचा कालावधी मिळाला असता तर हत्येचा उलगडा झाला असता. आता एनआयए काय करते हे पाहावे लागेल. फडणवीस रोज प्रेस घेऊन जनतेचे लक्ष भलतीकडं वळवण्याचे प्रयत्न का करत आहेत, हा मुख्य प्रश्न आहे. तपास योग्य दिशेने झाला पाहिजे. आमची भाबडी आशा आहे की, एनआयए योग्य तपास करेल,’ असा खोचक टोलाही त्यांनी हाणला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times