अमरावती: दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिव्यांग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

चार दिव्यांग बांधवांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याबाबत तिवसा पोलीस ठाण्याकडून जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला पत्र प्राप्त झाले होते. ही प्रमाणपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरील सही व शिक्केही बनावट होते. त्यामुळे अशी टोळी जिल्ह्यात सक्रिय असून, दिव्यांग बांधवांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन डॉ. निकम यांनी केले आहे.

बोगस क्रीडा प्रमाणपत्र तयार करून शासकीय नोकरी लाटण्याचे रॅकेट असल्याचे मध्यंतरी नागपूर येथे समोर आले. ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंग असणाऱ्या व्यक्तीला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. तसेच अनेक प्रकारचे परवाने देखील मिळवतात येतात. शिवाय अनेक लाभांच्या योजनांचा फायदा घेता येतो. अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत लेखनिक सुद्धा मिळतो. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा शारीरिक दृष्ट्या अपंग असणाऱ्या व्यक्तींना विशेष सवलत देण्यात येते.

क्लिक करा आणि वाचा-
याच पार्श्वभूमीवर अपंगाचे प्रमाणपत्र महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळेच कमी अपंगत्व असून सुद्धा किंवा अपंगत्व नसताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र तयार करून विविध शासकीय योजनांचा फायदा उचलणारी टोळी सक्रिय असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दिव्यांग बांधवांना बनावट प्रमाणपत्र देऊन त्यांची फसवणूक करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांनी अशा दलालांपासून सावध राहावे व त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

‘अडचण आली तर संपर्क साधा’

दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्राविषयी काहीही अडचण आल्यास त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या कक्ष क्रमांक २९ येथील सामाजिक सेवा विभागात संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here