जानेवारी, फेब्रुवारीत कमी झालेले करोनाचे रुग्ण मार्चमध्ये पुन्हा वाढले आहेत. त्यामुळं राज्यात करोनाची दुसरी लाट आली असल्याची शक्यता निर्माण होत आहे. मुंबई, पुणे आणि आता नागपूर या शहरांत झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळं या शहरात कठोर निर्बंधही घेण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात ३ हजारांच्या संख्येनं रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं चिंता वाढली आहे.
आज नागपुरात तब्बल ३ हजार ०९५ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ९९ हजार ७७१ इतकी झाली आहे. तर, दिवसभरात २ हजार १३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ६३ हजार ०८१ इतकी आहे.
जिल्ह्यात सध्या ३१ हजार ९९३ इतके अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, गेल्या २४ तासांत ३३ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला असून एकूण करोना मृतांचा आकडा ४ हजार ६९७ इतका झाला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times