नागपूर: विवाहित प्रेयसीसाठी चाकूने हाताची नस कापून २७ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बेलतरोडी परिसरात सोमवारी सकाळी घडली. दीपक संजय पाटील (वय २७ रा. येनगाव, जि.जळगाव),असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव असून व्यवसायाने तो चालक आहे.

विवाहित महिलेचा पतीचा व्यवसाय असून, तिला दोन मुली आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी विवाहितेची दीपक याच्यासोबत फेसबुकवर ओळख झाली. दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. जुलै महिन्यात दीपक नागपुरात आला. ३० जुलैला त्याने महिलेला पळवून नेले. विवाहितेच्या पतीने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दाखल केली. दीपक हा विवाहित महिलेसोबत जळगाव येथे राहात असल्याची माहिती बेलतरोडी पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तिथे गेले. त्यावेळी विवाहितेने नागपुरात परतण्यास नकार दिला. मुलींची आठवण येत असल्याने १५ दिवसांपूर्वी विवाहित महिला घरी आली. तिच्या पतीने तिचा स्वीकार केला. तीन दिवसांपूर्वी दीपक हा नागपुरात आला. तो महिलेच्या घरीच थांबला.

‘मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तु माझ्यासोबत परत चल’, असे दीपक तिला म्हणाला. विवाहितेने दीपकसोबत जाण्यास नकार दिला. दीपक याने विवाहित प्रेयसीच्या घरातच चाकूने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला. विवाहितेच्या पतीने बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी दीपक याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी दीपक याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मंगळवारी दीपक याला हॉस्पिटलमधून सुटी झाली. पोलिसांनी त्याची समजूत घातली. त्याला जळगावला परत पाठविले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here