मी जबाबदार या मोहिमेअंकर्गत वैयक्तिकरित्या सुद्धा शक्यतो हा उत्सव साजरा करणे टाळावे, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.
महापालिकेने केलेल्या या मनाईते पालन करून नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती महापालिकेने नागरिकांना केली आहे. मनाई असताना देखील नागरिकांनी होलिकोत्सव आणि धुलिवंदन किंवा रंगपंचमी सार्वजनिकरित्या साजरी करेल अशा व्यक्तीविरोधात साथरोग कायदा १८९७, आपत्ती निवारण कायदा २००५ आणि भा.दं.वि. १८६० कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबईत कालच्या दिवसात ३ हजार २६० नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन सारखे कठोर पाऊल उचलले जाणार का, हा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने होळी-रंगपंचमीबाबत हा निर्णय घेतला आहे.
मुंबईत करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. काल मुंबईत ३ हजार २६० नवे बाधित आढळले तर १ हजार ३२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दिवसभरात १० बाधितांचा मृत्यू झाला. मुंबईतील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या २५ हजार ३७२ इतकी आहे. तर, आतापर्यंत या संसर्गाने ११ हजार ५९२ इतक्या रुग्णांचा बळी घेतला आहे.
मुंबईत दादर, माहीम आणि धारावी या भागातही मोठी रुग्णवाढ पाहायला मिळत आहे. काल धारावीत ४०, दादरमध्ये ५७ तर माहीममध्ये ७१ अशी एकूण १६८ नवीन रुग्णांची भर पडली. सणासुदीच्या दिवसांमध्ये आणि विशेषत: आणि रंगपंचमीच्या दिवशी लोक एकमेकांना भेटत असतात, संपर्कात येत असतात. यामुळे मुंबईत करोनाचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असून परिस्थिती हाताबाहेर जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times