नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी येथे २० जानेवारी २०२१ रोजी एका पाच वर्षीय चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार करून तिची हत्या केली होती. ( sentences man to death for )
ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात १९ दिवसात तातडीने तपास पूर्ण केला होता ही देखील या प्रकरणातील विशेष बाब आहे. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आरोपींवरील आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. पुढे सुनावणी घेत अवघ्या ६४ दिवसांमध्येच न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.
बाबुराव सांगेराव असे या नराधमाचे नाव असून तो सालगडी होता. या सालगड्याने आपल्याच शेतमालकांच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती. बाबुराव सांगेवार हा घटनास्थळी दडून बसला होता. या घटनेनंतर मुलगी घरी आली नाही म्हणून शोधाशोध सुरू झाली होती. गायब झालेल्या मुलीचा शोध घेत असताना हा आरोपी गावकऱ्यांना सापडला. त्याचवेळी पोलीस तिथे आल्याने जमावाच्या तावडीतून आरोपी बचावला. याप्रकरणी पंधरा साक्षीदार तपासण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-
न्यायालयाने तत्परतेने सुनावणी पूर्ण करीत चाळीसाव्या दिवशी सुनावणी पूर्ण केली. न्यायालयाने या कृत्यासाठी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या या निकालाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असल्याची भावना जनसामान्यांमध्ये ऐकायला मिळत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
या प्रकरणी संपूर्ण जिल्हा बंदचं आंदोलन करण्यात आले होते. ही घटना जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील असल्यामुळे या घटनेचे विशेष गांभीर्य सर्वत्र निर्माण झाले होते. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यात दाखल झाले होते. भूमाता बिग्रेडच्या तृप्ती देसाई यांच्या दिवशी गावाच्या भेटीने या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळण्याचे गांभीर्य अधिक वाढले होते.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times