प्रसिधने जी कामिगिरी केली आहे, ती आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला करता आलेली नाही.
आज प्रसिधने अविस्मरणीय गोलंदाजी केली. कारण प्रसिधने भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिध फक्त तेवढ्यावरच थांबला नाही तर या सामन्यात प्रसिधने पहिला आणि अखेरचा बळी मिळवला. त्याचबरोबर पदार्पण करताना आज प्रसिधने चार बळी मिळवले. आतापर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला पदार्पण करताना चार बळी मिळवता आले नव्हते. त्यामुळे आता हा विक्रम प्रसिधच्या नावावर जमा झाला आहे.
प्रसिधने पदार्पण करताना भारताला पहिले यश मिळवून दिले. प्रसिधने यावेळी जेसन रॉयला ४६ धावांवर बाद केले आणि इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रसिधने बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांना माघारी धाडत तीन विकेट्स पटकावले. त्यानंतर अखेरच्या फलंदाजालाही बाद करत प्रसिधने यावेळी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले आणि सामन्यात सर्वाधिक विकेट्सही मिळवले.
प्रसिधने या सामन्यात चार बळी मिळवले, तर शार्दुलने यावेळी तीन बळी मिळवले. युवा शार्दुलने यावेळी स्थिरस्थावर झालेल्या बेअरस्टोला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. बेअरस्टोने यावेळी ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यानंतर शार्दुलने कर्णधार इऑन मॉर्गन आणि जोस बटलर यांचा काटा काढला आणि भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. प्रसिध कृष्णन (prasidh Krishna) आणि शार्दुल ठाकूर () हे युवा वेगवान गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. कारण या दोघांनी यावेळी प्रत्येकी तीन विकेट्स मिळवत त्यांचे कंबरडे मोडले आणि संघाला विजय मिळवून दिला. भुवनेश्वर कुमारने यावेळी दोन बळी मिळवत त्यांना चांगली साथ दिली. फिरकी गोलंदाजी हे भारताचे मुख्य अस्त्र समजले जाते. पण आज भारताला विजय मिळवून दिला तो वेगवान गोलंदाजांनी. त्यामुळे भारताचा हा विजय खास ठरतो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times