परळ उड्डाणपूल आणि परेल टीटी जंक्शनच्या दिशेने दक्षिण वाहिणीवरील लालब्रिजवरून भायखळ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी, तसेच भायखळा मार्केटकडून राणीच्या बागेसमोरून उत्तर वाहिनीवरून लालबाग उड्डाणपुलावर जाणारी वाहतूक २४ मार्चपासून ते १५ जून या कालावधीत दररोज रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहे. त्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.
त्यानुसार, परळ पूल आणि परळ टी.टी. जंक्शनकडून येणारी व भायखळ्याकडे जाणारी दक्षिण वाहिनीवरील सर्व वाहनांची वाहतूक लालबाग उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भायखळ्याच्या दिशेने वळवण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा-
तसेच भायखळा मार्केटकडून लालबाग उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या वाहतुकीला देखील पर्याय देण्यात आला आहे. त्यानुसार ही वाहतूक उड्डाणपुलाच्या खालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने परळच्या दिशेने जाईल.
क्लिक करा आणि वाचा-
वाहन चालकांच्या मार्गदर्शनासाठी वाहतूक पोलिसांकडून या मार्गावर मार्गदर्शक फलक लावण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांना मदत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. वाहन चालकांची कमीतकमी गैरसोय व्हावी आणि रहदारी सुरळीत सुरू राहावी असा वाहतूक पोलिसांचा प्रयत्न असणार आहे.
क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times