मुंबई: राज्यात आज दिवसभरात संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) आजच्या स्थितीची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली असून आज राज्यात नव्या रुग्णांची संख्या कालच्या तुलनेत काहीशी वाढली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार ६९९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २४ हजार ६४५ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ४ हजार ०५४ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १३, हजार १६५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या १९ हजार ४६३ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६४१ वर जाऊन पोहचली आहे. ( Latest updates)

मृत्यूचा आकडा वाढला

आज राज्यात एकूण १३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५८ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आज १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख ४७ हजार ४९५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ टक्क्यांवर आले आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६४१ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४३ हजार ५९० इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३३ हजार १६० इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २६ हजार ५९९ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या २२ हजार ५१३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

क्लिक करा आणि वाचा-
या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ७१० इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ६८६, औरंगाबादमध्ये १५ हजार ३८०, जळगावमध्ये ६ हजार ०८७, अहमदनगरमध्ये ४ हजार ९५९ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५८९ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३३२ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा-

११,७७,२६५ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८५ लाख ८४ हजार ४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ३३ हजार ०२६ (१३.६३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७७ हजार २६५ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ११ हजार ८८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here