वाचा:
खासदार इम्तियाज जलील हे आज लोकसभेत वित्त विधेयकावरील चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी जलील यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या उपस्थितीच हा मुद्दा उपस्थितीत केला व आपले परखड मत मांडले. केंद्र शासन विविध फंडांमधून पैसे मिळाल्याचे सांगत आहे. मात्र महाराष्ट्राला जीएसटीचे २८ हजार कोटी अजूनही केंद्राकडून मिळालेले नाहीत, असे नमूद करत युती तुटल्याचा कसा फटका महाराष्ट्राला बसतोय, त्याकडे जलील यांनी लक्ष वेधले. ही महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून कायम होती. आता सत्तेसाठी संघर्ष होवून दोन्ही पक्ष वेगवेगळे झाले आहेत. ही युती तुटल्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला हक्काचा पैसा दिला जात नाही, असे स्पष्ट दिसत आहे. याचा फटका महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे. तुमची युती तुटली यात महाराष्ट्राच्या जनतेची काहीच चूक नाही. मग महाराष्ट्राच्या जनतेने तुमच्यामधील वादाचा फटका का सोसावा, असा सवालच इम्तियाज जलील यांनी विचारला.
वाचा:
इम्तियाज जलील यांनी यावेळी खासदार निधीचाही मुद्दा उपस्थितीत केला. तसेच देशाला सध्या चांगली हॉस्पीटल, शैक्षणिक सुविधा आणि शिष्युवृत्ती सारख्या गोष्टींची गरज असताना, देशासाठी नवीन सात हजार पाचशे कोटी रुपये खर्चून संसदेची नवी इमारत का तयार केली जात आहे. सध्या हा पैसा लोकांचे जीव वाचविण्यासाठी खर्च करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times