पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शनिवारी २० मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे, की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना आवाहन केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबात दोघांना करोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आणि मुंबईत गेल्या काही दिवसापासून करोना संसर्गाने उचल खाल्ली असून राज्यात चिंतेचे वातावरण आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि हात धुणे या गोष्टी करण्याचा आग्रह देखील त्यांनी जनतेकडे धरला आहे.
क्लिक करा आणि वाचा-
मुंबईत महानगरपालिका प्रशासन देखील सतर्क झाले असून मुंबईत देखील अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. मॉल्स, चित्रपटगृहे आणि अशा इतर गर्दीच्या ठिकाणी करोना चाचण्या घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय आज महापालिकेने होळी, होलिकोत्सव आणि रंगपंचमी साजरी करण्यास मनाई देखील केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times