मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. काही महिन्यांपूर्वीही धनंजय मुंडे कोरोना बाधित झाले होते. त्यावेळी उपचार घेत मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. ( dhananjay munde second time tested )

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही.सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी.’

क्लिक करा आणि वाचा-
गेल्या वर्षी १२ जून या दिवशी धनंजय मुंडे यांना पहिल्यांदा करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी त्यांनी दोन दिवसांनी ट्विट करत म्हटले होते, ‘मित्रांनो, मी बरा आहे काळजी करू नका. कोणी कसलाही त्रास करून घेऊ नका. तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचते आहे. त्यामुळे अन्नत्याग, पायपीट, नवस असे स्वतःला इजा करणारे कृत्य करू नका ही कळकळीची विनंती. तुम्हाला होणारा त्रास हा मला वेदना देणारा आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

रश्मी ठाकरे यांनाही झाली करोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांनाही ही आज करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना वर्षा या शासकीय निवासस्थानी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी त्याचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही करोनाची लागण झाली आहे.

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here