लोकल सेवेबाबत काय म्हणाले आरोग्यमंत्री…?
मुंबईमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. करोना रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत. लोकांनी मास्कचा वापर करणे, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले पाहिजे. पण तर लोकांनी नियम पाळले नाहीत, तर मात्र लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात लॉकडाउन लागू होईल या या प्रश्नाचे उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, लॉकडाउन हा शेवटचा पर्याय आहे.
क्लिक करा आणि वाचा-
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत लपवाछपवी होते का अशी शंका उपस्थित केली जाते. त्यावरही टोपे यांनी भाष्य केले आहे. आपल्या राज्यात अशा प्रकारची लपवाछपवी केले जात नसल्याचे ते म्हणाले. इतर राज्यात बहुदा आकडे लवपले जात असावेत. कारण काही राज्यात निवडणूक होत आहे. मोठमोठ्या सभा देखील होत आहेत. असे असतानाही तेथील रुग्णसंख्या कमी आहे, असेही टोपे पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
आपले राज्य हे इतर राज्यांच्या तुलनेत मोठे राज्य आहे. आपल्या राज्यात साडेबारा कोटी लोक राहतात. हे पाहता जर लोकसंख्येच्या प्रमाणात तुलना करायची झाल्यास काही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत, असेही ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी या आठवड्यात मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली. आज बुधवारी मंत्रिमंडळ बैठक आहे. या बैठकीत करोनाची सद्यस्थिती आणि लॉकडाउनवर चर्चा होईल असेही टोपे म्हणाले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times