पाटणाः बिहार विधानसभेत ( ) मंगळवारी तुफान राडा बघायला मिळाला. सशस्त्र पोलीस दल विधेयक-२०२१ वरून () विधानसभेत मोठा गदारोळ आणि हिंसा दिसून आली. हा सर्व गोंधळ रोखण्यासाठी अखेर पोलिसांना पाचारण करावं लागलं. कुठल्याही स्थितीत विधेयक मंजूर होऊ नये यावर अडून बसलेले राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसच्या आमदारांविरोधात पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. विरोधी पक्षाच्या आमदारांना धक्के मारून आणि काहींचे पाय खेचून बाहेर काढण्यात आलं. विरोधी पक्षाच्या महिला आमदारांनाही अशाच प्रकारे सभागृहाबाहेर काढलं.

विधानसभेच्या आत आणि बाहेर अभूतपूर्व गदारोळ

बिहार विधानसभेच्या इतिहासात अशी घटना कधीच घडली नाही. विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहा आणि सभागृहा परिसरात जोदराद गोंधळ घातला. हा गदारोळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला की अखेर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मोठ्या संख्येत पोलीस बळ विधानभवनात बोलवावं लागलं. यावेळी आमदारांसोबत पोलिसांच्या झटापटीचे व्हिडिओ व्हायरल झाले. मल्ल युद्ध सारख्या स्थितीत अखेर संध्याकळी बिहार सशस्त्र पोलीस बल विधेयक २०२१ विधानसभेत मंजूर झालं. गोंधळ घालत असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना बाहेर काढल्यानंतर उर्वरीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला. गदारोळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाईल, असं विधानसभेचे अध्यक्ष विजयकुमार सिन्हा यांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षांनाच घेरल्याने पोलिसांना पाचारण

विरोधी पक्षाच्या आमदारांनी थेट विधानसभा अध्यक्षांना घेरल्याने आणि कक्षाच्या प्रत्येच दारावर ठिय्या दिला. दारं दोरखंडांनी बांधल्याचा आरोप आहे. स्थिती चिघळत असल्याचे पाहून पाटणाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना माहिती देण्यात आली. मोठ्या पोलीस बळासोबत ते विधानसभेत दाखल झाले. मग हिंसक झालेल्या आणि बळजबरी करणाऱ्या आमदारांना फरफट विधानसभेतून पोलिसांनी बाहेर काढलं. यावेळी आरजेडीचे नेते तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे विधानसभेत उपस्थित होते.

विरोधी पक्षाच्या आमदारांनी रिपोर्टर टेबल खुर्च्या फेकल्या. हा टेबल उलटवण्याचा प्रयत्नही केला. पण मार्शलनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तास स्थगित करावा लागला. विधानसभेचं कामकाज दुपारी १२ वाजता सुरू झाल्यानंतर विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचं कामकाज पुन्हा तहकूब झालं. दुपारनंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या आमदारांनी रिपोर्टर टेबलावर चढून घोषणाबाजी सुरू केली. यामुळे सभागृहाचं कामकाज पुन्हा तहकूब झालं.

सत्ताधारी आमदारांनी आरजेडी आणि काँग्रेसच्या आमदारांना थप्पड मारल्या, असा आरोप विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला. आरजेडीचे आमदार सुधाकर, सतीश दास आणि काँग्रेसचे आमदार संतोष मिश्रा यांना पोलिसा कारवाईत दुखापत झाली. त्यांना स्ट्रेचरवरून उपचारासाठी नेण्यात आलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here