वाचा:
सध्या काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व भाजपचे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे आहे. ही सत्ता उलथून टाकण्याचा निर्धार करत पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, जनसुराज्य पक्ष तसेच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने व आमदार विनय कोरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
वाचा:
महाविकास आघाडीच्या वतीने लढवल्या जाणाऱ्या विरोधी पॅनेलमध्ये सत्ताधारी आघाडीतील काही संचालक सहभागी झाले आहेत. यामुळे निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. गेल्यावर्षी संचालक मंडळाची मुदत संपली असली तरी करोनामुळे मुदतवाढ मिळाली होती. ही निवडणूक पुढे ढकलावी म्हणून सत्ताधारी आघाडीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सहकार प्राधिकरण विभागाने या निवडणुकीची घोषणा केली आहे. २१ संचालक निवडीसाठी येत्या २ मे रोजी मतदान व ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी ३६५६ संस्थांचे ठरावदार मतदान करणार आहेत. महिन्याला शंभर कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणारी ही संस्था जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या संस्थेवर सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड घमासान होणार आहे.
वाचा:
निवडणूक कार्यक्रम
२५ मार्च ते १ एप्रिल – अर्ज भरणे
५ एप्रिल – छाननी
६ ते २० एप्रिल – माघार
२२ एप्रिल – चिन्हवाटप
२ मे – मतदान
४ मे – मतमोजणी
……………………………………
गोकुळ दूध संघ
संलग्न दूधसंस्था- ३९००
एकूण पात्र ठरावदार- ३६५६
संचालक मंडळ- २१
रोजचे दूधसंकलन – १२ लाख लिटर
कर्मचारी – १५००
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times