अमरावती: जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकऱ्यांचा करूनसुद्धा चुकारा न करणाऱ्या मालकाला धडा शिकवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( )

वाचा:

वर्षभर शेतात काबाड कष्ट करून शेतकरी पिक घेतो. कधी हवामान तर कधी बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येते. अशात शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत अनेक व्यापारी गैरव्यवहार करतात. म्हणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बाजार समितीच्या संचालक मंडळाने खूप मोठा निर्णय घेतला असून त्यामुळे व्यापाऱ्यांच्या दादागिरीला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल व त्याचवेळी गैरव्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर वचक बसणार आहे.

वाचा:

कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून त्याचा चुकारा न करणाऱ्या जिनिंग मालकाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. या वादाचा निपटारा करण्यासाठी त्याला १० मार्च रोजी बाजार समितीमध्ये बोलावले असता तो सभेला गैरहजर राहिला. त्यामुळे संचालक मंडळाने रितसर ठराव घेवून पोलिसांत तक्रार दिली. शिवाय जिनिंगने ६० हजारांच्या सेसचा भरणा देखील केला नाही. त्यामुळे बाजार समितीने रविवारी (दि. २१) झालेल्या मासिक सभेत अल उमर जिनिंग प्रेसिंगचा परवाना रद्द करण्याचा सर्वानुमते ठराव घेतला असून जिनिंग सील करण्याचीही कारवाई केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव गजानन नवघरे यांनी दिली.

वाचा:

फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये अकोट येथील मालती गजानन घोडेस्वार, मतीनखान जलील खान, मनोज गजानन झुमे व पुरुषोत्तम माधव मोहकार यांचा समावेश आले. जिनिंग मालकाने त्यांच्याकडे कापसाची खरेदी करीत त्यांना सदर रकमेचे धनादेश दिले, परंतु बँकेत पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटले नाहीत. याबाबत शेतकऱ्यांनी जाब विचारला असता, त्याने अरेरावी केली. याबाबत शेतकऱ्यांना व बाजार समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने रविवारी झालेल्या बाजार समितीच्या मासिक सभेत ठराव घेवून त्या जिनिंगची अनुज्ञप्ती रद्द करून लवकरच जिनिंगला सील लावले जाणार आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here