मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी गृहमंत्री यांच्यावर लेटरबॉम्ब टाकल्यानंतर भाजपकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. रोज नवे दस्तावेज हातात घेऊन विरोधी पक्षनेते सरकारवर हल्ले चढवत आहेत. त्यातच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष यांनी एक खोचक सवाल फडणवीस यांना करताच थेट यांनी जगताप यांना आव्हान दिले आहे व त्यातून फडणवीस विरुद्ध जगताप असं वाकयुद्ध रंगलं आहे. अमृता फडणवीस यांना आता टोचणारं प्रत्युत्तर जगताप यांनी दिलं आहे. ( )

वाचा:

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७ मध्ये पोलिसांची खाती अमृता फडणवीस ज्या बँकेत आहेत त्या अॅक्सिस बँकेत वळवण्यात आली होती. त्यावरून जगताप यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ही बँक खाती तेव्हा कशाच्या आधारावर वर्ग करण्यात आली होती, असा सवाल फडणवीस यांना जगताप यांनी केला होता. याशिवाय फडणवीसांनी भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दाबल्याचा दावाही जगताप यांनी केला होता. या सगळ्याचा तपशीलच जगताप यांनी मांडला होता. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. जगताप यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत अमृता यांनी जगताप यांना आव्हान दिले. ‘ए भाई , तू जो कोण असशील-माझ्या वर बोट उचलायचं न्हाय! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही UTI बँक / Axis बँकला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवचायचे न्हाय’, असे ट्वीट अमृता यांनी केले होते. यावर जगताप यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी पुन्हा एकदा वस्तुस्थितीवर बोट ठेवत निशाणा साधला.

वाचा:

अमृता फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटला मला महत्त्व द्यायचं नाही, असे नमूद करताना ‘२००५ मध्ये आघाडी सरकार असताना पोलिसांची खाती वर्ग करण्याचा हा विषय झाला होता. १६ बँकांचा त्यात प्रस्ताव होता. मात्र, आमचं सरकार असेपर्यंत आम्ही त्यावर निर्णय घेतला नाही. मग २०१७ मध्ये अशी काय जादू झाली की अॅक्सिस बँकेकडे पोलिसांची खाते वर्ग करण्यात आली? मी तोच तर प्रश्न विचारला आहे. त्यामुळे कुणाला काय वाटतं यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचं आहे. त्यातही ही गोष्ट खरी आहे की, सत्य जरा जास्त टोचतं, हे ट्वीटमधील भाषेवरून समोर आलं’, असा टोला जगताप यांनी लगावला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here