सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मी केली आहे. ही मागणी मान्य होणार असून आता लवकरच ठाकरे सरकारचं विसर्जन होणार आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रपती राजवटीची मागणी उद्या पुन्हा संसदेतही मी करणार आहे, असेही राणे यांनी पुढे सांगितले. ( )

वाचा:

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळलेली स्फोटकं, यांची अटक, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री यांच्यावर केलेले आरोप, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या मुद्द्यांवर बोट ठेवत नारायण राणे यांनी आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री यांना लक्ष्य केले. सचिन वाझे हे मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत होते, असा दावा करताना वाझेसारख्या एपीआयच्या अनेक वेगवेगळ्या गाड्या आढळल्या असतील तर त्याच्या बाकीच्या प्रॉपर्टीचीही चौकशी व्हायची आहे. अशा माणसाला पाठीशी घातले जाऊ नये, अशी मागणी राणे यांनी केली.

वाचा:

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार सगळ्या आघाड्यांवर अपयशी ठरलं आहे. पोलीस खात्यात कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप राणे यांनी केला. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांची गाडी आढळल्यानंतर त्या ठिकाणी सचिन वाझे पहिले पोहचले होते. मनसुख हिरन आणि सचिन वाझे यांचे संबध असल्याचे बाहेर आल्यावर मनसुखची हत्या करण्यात आली. सचिन वाझेंनी ही हत्या केल्याचा आरोप मनसुखच्या पत्नीने केला तरी मुख्यमंत्र्यांनी त्याला पाठीशी घातलं, असे नमूद करताना सचिन वाझे पोलीस आयुक्तांपेक्षा मोठा आहे का?, असा सवाल राणे यांनी केला. मनसुख हिरन प्रकरणात सचिन वाझे यांना अटक होऊ नये म्हणून मुख्यमंत्रीनी प्रयत्न केले, असा आरोपही राणे यांनी केला.

वाचा:

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप होऊनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनीही देशमुख यांना वाचवण्यासाठी त्यांची बाजू घेतली. मुंबईचा पोलीस आयुक्त राहिलेला अधिकारी आरोप करत असताना पवारांसारखा वरिष्ठ नेताही देशमुख यांना पाठिशी घालत असेल तर बाब अधिकच गंभीर आहे. कोणी निंदा, कोणी वंदा भ्रष्टाचार करणं हाच आमचा धंदा असाच एकंदर या सरकारचा कारभार या सगळ्यातून दिसतो, असे राणे पुढे म्हणाले. राज्यात सध्या पैसे घेऊन बदल्या केल्या जात आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचा आरोप रश्मी शुक्ला यांनीच केलेला आहे. त्याचीही मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली नाही. तीन पक्षात फक्त पैसे वाटपाचा कार्यक्रम चालला आहे, असा आरोपही राणे यांनी केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here