थायलंडमधील स्थानिक वृत्तानुसार, या सैनिकाने आपल्या वरिष्ठाला ठार मारल्यानंतर मिलिटरी कॅम्पमधील शस्त्रे घेऊन लष्करी वाहन घेऊन बाहेर पडला. एका स्थानिक शॉपिंग सेंटरमध्ये घुसून त्याने गोळीबार केला. या गोळीबारात २० जण ठार झाले असून अनेक जखमी असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तसंस्थांनी दिले आहे. अचानक झालेल्या गोळीबारामुळे घटनास्थळी असलेले नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी या शॉपिंग सेंटरला वेढा घातला आहे. हल्लेखोर सैनिकाने शॉपिंग सेंटरमध्ये कितीजणांना ओलिस ठेवले आहे, याची माहिती समजली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हल्लेखोर सैनिकाने फेसबुकवर हल्ला करण्यापूर्वी पोस्ट लिहीली होती. काही तरी करून दाखवण्याची वेळ आली आहे आणि कोणीही मृत्यूला नाकारू शकत नाही, अशा आशयाची पोस्ट त्याने सोशल मीडियावर हल्ला करण्यापूर्वी लिहीली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times