मुंबई: यांनी केंद्र गृहसचिवांकडे सादर केलेला फोन टॅपिंग व बदल्यांच्या अहवालावरुन यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता. यावर, फडणवीसांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जर तो लवंगी फटाका होता तर एवढे घाबरले का?, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फोन टॅपिंग आणि आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेट त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘काल जो अहवाल दिला तो लवंगी फटका होता की मोठा बॉम्ब, हे लवकरच समोर येईल. जर तो लवंगी फटाका होता, तर एवढे का घाबरले? तसेच २५ ऑगस्ट २०२० पासून तो दाबून का ठेवला होता? यातून कोणाचे चेहरे बाहेर येणार होते. नेमकं कोणाला वाचवण्यासाठी तुम्ही तो दाबून ठेवला होता,’ असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले आहेत.

गेल्या काही दिवसात ज्या प्रकारच्या घटना बाहेर येतात. त्या चिंताजनक आहेत. इतक्या मोठ्या घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मौन चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन हे घातक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दोनदा पत्रकार परिषद घेतली. पण त्यात त्यांनी पाठीशी घालण्याचे काम केले. तर राज्यातील काँग्रेस ही अस्तित्वहीन आहे. त्यांची काहीही भूमिका नाही. त्यांचे नेते दिल्लीत एक आणि इथे वेगळं बोलतात, असं म्हणत फडणवीसांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला आहे.

मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे. तसंच, राज्यपालांना वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत. मुख्यमंत्री बोलत नसतील तर राज्यापालांनी बोलत करावं. खंडणीच्या घटनेत काय कारवाई केली? याबाबतचा अहवाल घेतला पाहिजे, अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here