बीडः राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक शहरात कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळं बीड जिल्ह्यातही १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे.

राज्यात करोनानं डोकं पुन्हा वर काढल आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात २० हजारांच्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई, पुणे नागपुरसह अनेक जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळं बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.

बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश जारी केली आहेत. या आदेशानुसार, २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहेत.सर्व खासगी कार्यालय, मंगल कार्यालय, हॉटेल बंद राहणार आहेत. तसंच, अत्यावश्यक सेवेनुसार किराणा दुकान, दुध विक्री आणि मेडिकल दुकाने सुरु राहणात आहेत.

वाचा:

दरम्यान, महाराष्ट्रात मंगळवारी गेल्या २४ तासांत राज्यात २८ हजार ६९९ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १३, हजार १६५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ६४१ वर जाऊन पोहचली आहे. काल राज्यात एकूण १३२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here