मुंबई: परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर माजी मुख्यमंत्री व यांनी पत्रकार परिषदांचा धडाका लावला आहे. तसंच, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारला घेरलं आहे. या सगळ्या घडामोडींवर महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी भाष्य केलं आहे. तसंच, मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांना निलंबीत केलं असतं, असंही ते म्हणाले आहेत.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला आहे. तसंच, भाजपनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका घेतला आहे, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे. परमबीर सिंह यांच्या बदलीसंदर्भात पटोले यांनी प्रश्न विचारले असता त्यांनी, मी जर सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंह यांची बदली केली नसती त्यांना निलंबीतच केलं असतं, असं म्हटलं आहे.

‘अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

केंद्राचा दबाव आणून आयपीएस अधिकाऱ्यांचा वापर केला जातोय, असा आरोप पटोले यांनी केला आहे.आज भाजपच्या शिष्टमंडळांनी राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालावं असं एक निवेदन दिलं आहे. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजभवन हे भाजपचं कार्यालय झालंय. राज्यपालांची भूमिका संशयास्पद आहे. अशी शंकाही नाना पटोले यांनी उपस्थित केली आहे. दरम्यान, नाना पटोले व काँग्रेसचे इतर आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here