म. टा. प्रतिनिधी, : चालकाला मारहाण करून लुटारू कार घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास हिंगण्यातील सुकळी येथे घडली. अनिल किसनराव हत्तीमारे (वय ३८, रा. पाचपावली), असे चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल हे समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदाराकडे चालक आहेत. सोमवारी दुपारी कार (एमच ४९ यू ५४९९) घेऊन ते कंत्राटदाराला घेण्यासाठी जात होते. सुकळी परिसरात मोटारसायकलवर आलेल्या तीन लुटारूंनी त्यांना अडविले. त्यांना मारहाण करीत कारमधून बाहेर ओढले. त्यांच्याकडील मोबाइल व रोख हिसकावली. त्यानंतर एक लुटारू कारने तर अन्य दोघे मोटारसायकलने पसार झाले. अनिल यांनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून लुटारूंचा शोध सुरू केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times