राणे पिता पुत्र या निवडणुकीत स्वतः लक्ष ठेवून आहेत. लोकसभेचं अधिवेशन सोडून राणेंना जिल्ह्यात ठाण मांडून राहव लागलयं यावरून राणेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचं दिसून येतय. अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपलाच विजय होईल असा दावा केलाय.
शिवसेनेला या निवडीत जंगजंग पछाडावं लागलं आहे. त्यामुळं थेट मातोश्री कनेक्शन या निमित्ताने उघड झालं आहे. राणेंच्या बालेकिल्ल्यातील एखादा चिरा ढासळतोय का हे पाहाण्यासाठी मातोश्रींला थेट हस्तक्षेप करावा लागलाय, असा आरोप भाजप जिल्हा परिषदेचे गट नेते रणजीत देसाई यांनी केला आहे.
तर शिवसेनेनेही राणेंना शह देण्यासाठी रणनीती आखल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातयं. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी अध्यक्ष निवडीरवरुन राणेंना लक्ष्य केलंय. ‘राणेंना उमेदवार निवडीसाठी सुद्धा तडजोड करावी लागली हीचं शिवसेनेची ताकद आहे स्वतः राणेंना अध्यक्ष पदाच्या निवडीत सदस्यासमोर दया याचना करावी लागली. काही ठीकाणी शपथी घ्याव्या लागल्यात तर काही जणांना आमिषं दाखवली तर काहींना धमकावलं असा, आरोप वैभव नाईक यांनी केलाय.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times