मुंबई: सचिन वाझेंना अटक आणि त्यानंतर परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. यावरुनच राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं राज्य सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्ष नेते हे सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तर, काँग्रेसनंही भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपा नेत्यांनी राज्यपालांच्या भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेसवरही हल्ला चढवला आहे. काँग्रेसहा अस्तित्वहीन पक्ष आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला होता. तर, काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं असंही त्यांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला थेट इशारा दिलं आहे.

काँग्रेस नेत्यांनी काल राज्यातील एकंदर राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपाची सत्तेच्या हव्यासापोटी सुरू असलेली थेरं आम्ही पाहत आहोत. संविधानिक पदांचा दुरुपयोग व संविधानिक मर्यादांचे उल्लंघन केले जात आहे यावर आमचे लक्ष आहे. भाजपाचे षडयंत्राची आम्हाला माहिती आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

फडणवीस सरकारमधील भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले होते . पाच वर्षांत भाजपाने केलेले काळे कारनामे आम्हाला पूर्णपणे माहित आहेत. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर भाजपाची पळता भुई थोडी होईल. योग्य वेळी ते होईलच! त्या वेळेची वाट पहावी, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here