म. टा. प्रतिनिधी, : खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेले चौघे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर त्यांचे शिवणेमध्ये फटाके वाजवून स्वागत करण्याबरोबर लोकांना दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. शिवणेमधील राहुलनगर येथील बसथांब्यासमोर मंगळवारी दुपारी दीड वाजता हा प्रकार घडला. या प्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे.

सागर भालेराव वारकरी (वय २१), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, ), आकाश सिब्बन गौंड (वय १९), सागर राजेंद्र गौड (वय १९, रा. कदम वस्ती, शिवणे) व त्यांचे समर्थक सुरज राजेंद्र गौड (वय २४, रा. एन डी ए रोड, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अभिषेक गुप्ता व त्याचे इतर सहा ते सात साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक संतोष नांगरे यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. येरवडा कारागृहात ते होते. कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी ते तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर वारकरी व इतरांच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार दुपारी दीड वाजता राहुलनगर येथील बसथांब्यावर जमले होते. त्यांनी हे चौघेही तेथे आल्यावर जोरजोराने घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी केली. त्यावेळी नागरिकांना देखील शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानतंर त्यांनी घटनास्थळी धाव घेत, पाच जणांना ताब्यात घेतले. तर, अभिषेक गुप्ता व इतर सहा ते सात जण पळून गेले. पुढील तपास उत्तमगनर पोलीस करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here