मुंबई: परमबीर सिंग लेटरबॉम्ब () प्रकरणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी () यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला. पक्ष हा अस्तित्वहीन पक्ष असून काँग्रेसला किती वाटा मिळाला हे त्यांनी सांगावे, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. ( gives reply to the criticism made by )

मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करत नाना पटोले यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, असा टोला त्यांनी यावेळी भाजपाला लगावला. वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलेले आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसचे लोक प्रत्येक मंत्रालयात होते, तसेच फडणवीस यांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोक होते याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत, असे पटोले म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असा टोलाही पटोले यांनी लगावला. आम्ही देश विकून देश चालवत नव्हतो, उलट काँग्रेस पक्षाने देशाला उभे करण्याचे काम केले, असेही नाना पटोले पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
काँग्रेसने या देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही जर देश विकून ते चालवणारे लोक काँग्रेसला वाट्याबाबत बोलत असतील, तर फडणवीस सरकारमध्ये जे पाप झाले ते आता राज्य सरकारने उघडकीस आणले पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग कोणाच्या पे रोलवर होते हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे वाटा भाजपावाले कसा घेतात हे जनतेला माहीत आहे, असा प्रतिआरोप करत आम्ही विधानसभेत आमची भूमिका मांडली होती, असे पटोले यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
शेतकरी आंदोलन, लसीकरणापासून वंचित राहिलेले देशातील नागरिक आणि महागाई अशा महत्वाच्या मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठीच भाजपने ही व्यूहरचना केली असल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here