मुंबई: एकीकडे मनसुख हिरन प्रकरण (), अँटिलिया स्फोटके प्रकरण () आणि सचिन वाझे प्रकरणावरून () विरोधी पक्ष असलेल्या भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू ठेवला असताना दुसरीकडे मराठा आरक्षणावरूनही आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडण्याची संधी सोडलेली नाही. मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असून कोर्टातील युक्तीवादावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे. तुम्ही फसवणुकीने सत्तेवर आला आहात, मग आलाच आहात तर स्वकर्तृत्वही दाखवा अशी टीकाही पाटील यांनी केली आहे. ( criticizes govt over issue)

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गेल्या कित्येक वर्षांचा मराठा आरक्षणाचा तिढा सुटला. या मराठा आरक्षणाच्या कायद्याला केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात भक्कम पाठिंबा दिला, अशा शब्दात मागील सरकारची कामगिरी दाखवत, स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे, असा टोलाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे.

क्लिक करा आणि वाचा-
मराठा आरक्षणावर बोलताना पाटील पुढे म्हणतात की, राज्य सरकारला असा कायदा करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि हा कायदा संवैधानिक आहे. हाही भक्कम युक्तिवाद केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला. कर्तव्यशून्य, अपयशी आणि कोणत्याच गोष्टीकडे गांभीर्याने न पाहणाऱ्या सरकारच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन आहे,असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. एकावर एक ट्विट करत पाटील यांनी महाविकास आघाडीवर हा हल्लाबोल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-
या सरकारच्या मनात थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर आता तरी केंद्र सरकारच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा स्वत:चे कर्तृत्त्व दाखवा. भलेही फसवणुकीने तुम्ही सत्तेत आले असाल! आता आलाच आहात, तर थोडे तरी स्वकर्तृत्त्व दाखवा,” असा तिखट शब्दात पाटील यांनी महाविकास आघाडीला सुनावले आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here