नांदेडमध्ये उद्या २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन असणार आहे. नांदेडमध्ये भाजीपाला, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते दुपारी १२ ही वेळ देण्यात आली आहे. या बरोबरच जिल्ह्यांतर्गत बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे.
हा लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यानच्या काळात होळी येत असल्याने या लॉकडाउनचा सणावर परिणाम होणार आहे.
नांदेड जिल्हयात करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १ हजार ३३० इतकी झाली आहे. तर नांदेडमध्ये आज १० करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बीडमध्येही लॉकडाउन
जाहीर करण्यापूर्वी बीड जिल्ह्यात देखील लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बीडमध्ये २६ मार्चपासून ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.
दरम्यानच्या काळात नाशिकमधील लॉकडाउनबाबत नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी अतिआवश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहेत. सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सकाळी ७ पासून ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच अतिआवश्यक सेवेशी संबंधित दुकाने आणि आस्थापना सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times