मुंबई: मुंबईत विषाणूने शिरकाव केल्यानंतर आजवरची सर्वोच्च रुग्णवाढ आज नोंदवली गेली आहे. गेल्या २४ तासांत क्षेत्रात तब्बल ५ हजार ६७ नवीन रुग्णांची भर पडली असून मुंबईकरांसाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा ठरली आहे. ( )

वाचा:

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून नवीन करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी मुंबईत ३ हजार ५१२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर आज हा आकडा पाच हजारपार गेला असून मुंबईतील एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या गेल्या २४ तासांत नोंदवली गेली आहे. मुंबईत आज एकूण ५ हजार ४४४ नवीन रुग्ण आढळले. त्यातील २२८ रुग्ण आयसीएमआरच्या यादीत दुबार आढळले तर १४९ रुग्ण बाहेरचे आहेत. एकूण रुग्णांत निव्वळ मुंबईतील ५ हजार ६७ रुग्ण असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

वाचा:

दरम्यान, मुंबईत करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. आजच पालिकेकडून तब्बल ४७ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत मुंबईत दररोज ५० हजार चाचण्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचेही पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

वाचा:

मुंबईत लावणार नाही!

मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी लॉकडाऊन लावले जाणार नाही, अशी भूमिका पालिकेने सध्यातरी घेतली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी आज तसे अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले. मुंबईत कोविड विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर तसेच चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here