मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या करोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा उचल खाल्ली असून गेल्या २४ तासांत राज्यात ३१ हजार ८५५ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या २८ हजार ६९९ इतकी होती. कालच्या तुलनेत ही वाढ ३ हजार १५६ ने अधिक आहे. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण १५ हजार ०९८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल ही संख्या १३ हजार १६५ इतकी होती. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ४७ हजार २९९ वर जाऊन पोहचली आहे. ( Latest updates)

आज राज्यात एकूण ९५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या १३२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के इतका आहे. राज्यात आज १५ हजार ०९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २२ लाख ६२ हजार ५९३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२१ टक्क्यांवर आले आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ लाख ४७ हजार २९९ इतकी झाली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ४९ हजार ०३६ इतरे रुग्ण आहेत तर नागपूर जिल्ह्यातील आकडा वाढून तो ३४ हजार ०१६ इतका झाला आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा २९ हजार ३९५ इतका आहे. तर ठाणे जिल्ह्यात सध्या २४ हजार ५६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

या बरोबरच नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ०४८ इतकी आहे. अमरावतीत ही संख्या ३ हजार ६९५, औरंगाबादमध्ये १६ हजार १७५, जळगावमध्ये ६ हजार ०७२, अहमदनगरमध्ये ४ हजार ८७४ इतकी आहे. तर, कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ५७१ इतकी आहे. राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३५० इतकी आहे.

१२,६८,०९४ व्यक्ती होम क्वारंटाइन
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ८७ लाख २५ हजार ३०७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २५ लाख ६४ हजार ८८१ (१३.७० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १२ लाख ६८ हजार ०९४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १३ हजार ४९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here