मुंबई: महाराष्ट्रातील बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत महामोर्चाचं आयोजन केलं आहे. पक्षाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या मोर्चासाठी राज्यभरातील मनसैनिक मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मनसेनं राजकीय भूमिका बदलल्यानंतरचा हा पहिला मोर्चा असल्यानं त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

लाइव्ह अपडेट्स:

>> मोर्चाला जाण्याआधी मुंबईतील कार्यकर्त्यांची दादरच्या राम मंदिरात आरती

>> मनसेच्या मोर्चाला पुढील तासाभरात सुरुवात होणार… कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

>> राज ठाकरे यांच्या भाषणासाठी आझाद मैदानात व्यासपीठ सजले

>> मनसेच्या मोर्चासाठी पुण्यातून निघालेल्या बसवर भाजप आमदाराचं नाव, चर्चेला उधाण

>> शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरल्यानंच मनसेच्या महामोर्चावर टीका – संदीप देशपांडे

>> शिवसेनेच्या आरोपाला मनसेचं प्रत्युत्तर… शिवसेना हीच राष्ट्रवादी बी टीम असल्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांचा टोला

>> मनसेच्या मोर्चामागे भाजपचा हात, शिवसेनेचा संशय

>> मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

>> मनसेच्या निमित्तानं फेसबुक, ट्विटरवरून वातावरणनिर्मिती, फोटो पोस्ट व व्हिडिओ होताहेत व्हायरल

>> राज्यभरातून मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना

>> आझाद मैदानावर होणार मोर्चाचा समारोप; राज ठाकरे जाहीर सभेला संबोधित करणार

>> दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून होणार मोर्चाला सुरुवात

>> मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व

>> बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध मुंबईत आज मनसेचा महामोर्चा

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here