चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आज आपल्या संघाची नवीन जर्सी लाँच केली. यावेळी कोहलीचा एक खास व्हिडीओ संघाने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस पडला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चेन्नईच्या या नवीन जर्सीच्या माध्यमातून भारतीय सेनादनालाही सलाम करण्यात आला आहे. या जर्सीच्या खांद्याची डिझाइन बदलण्यात आली आहे. भारताच्या आर्मीचा जसा गणवेश असतो, तसा रंग यावेळी जर्सीच्या खांद्याला देण्यात आला असून या माध्यमातून भारतीय सेनादलाला कुर्निसात करण्याचा एक प्रयत्न चेन्नईच्या संघाने केल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर या जर्सीमध्ये काही बदलही करण्यात आलेले आहेत.

धोनीचा हा अखेरचा आयपीएलचा हंगाम असेल, असे म्हटले जात आहे. गेल्यावर्षी झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेईल, असे सर्वांना वाटत होते. कारण आयपीएल सुरु होण्यापूर्वी धोनीने चेन्नईमध्ये असताना भारतीय संघातून निवृत्त होण्याचा अचानक निर्णय घेतला होता. त्यावेळी सर्वांनाच या निर्णयामुळे धक्का बसला होता. त्यामुळे आयपीएलचा हंगाम संपल्यावर धोनी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती घेईल, असे वाटत होते. पण चेन्नईची संघबांधणी करायची असल्यामुळे धोनी हा हंगाम खेळणार असल्याचे समजते आहे.

चेन्नईच्या संघ यावेळी मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण चेन्नईच्या संघातील काही खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे, तर काही मोठ्या खेळाडूंना चेन्नईच्या संघाने लिलावात आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. त्यामुळे आता धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ या हंगामात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. कारण आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेन्नईचा संघ सर्वात पहिल्यांदाच स्पर्धेच्या बाहेर गेला होता. त्याचबरोबर संघ गुणतालिकेत तळालाही होता. त्यामुळे चेन्नईचे चाहते निराश झाले होते. पण या मोसमात धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ काय कमाल करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here