मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर गृहनिर्माण मंत्री आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रश्मी शुक्ला यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी दिली आहे. या यादीमधील ९० टक्के बदल्या मात्र झालेल्याच नाहीत. मग असे असताना हे आरोप कशाचे आहेत? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला.
कायद्यानुसार कोणाचाही फोन टॅप करता येत नसल्याचे आव्हाड म्हणाले. केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी स्पष्ट करण्यात आले आहे. यात राष्ट्रविरोधी किंवा राष्ट्राला घातक ठरतील अशी कृत्ये, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध, किंवा शांतता भंग करेल अशी संशयीत व्यक्ती या प्रकारांशिवाय इतर कोणत्याही स्थितीत फोन टॅपिंग करता येत नाही. त्यामुळे रश्मी शुक्ला यांनी दिलेली कारणे संयुक्तिक नव्हती, असे आव्हाड म्हणाले.
‘हा राईट टू प्रायव्हसीचा भंग’
रश्मी शुक्ला यांनी घेतलेल्या फोन टॅपिंगच्या परवानग्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची घ्यायची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याचेच करायचे असा प्रकार त्या करत होत्या. यामध्ये अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे आणि हे अनेकदा करण्यात आले, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
क्लिक करा आणि वाचा-
‘रश्मी शुक्ला यांनी वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात केला’
फोन टॅप करुन ठेवायचे आणि नंतर त्याचा वापर करायचा असे प्रकार रश्मी शुक्ला यांनी केले आहेत. यामध्ये रश्मी शुक्ला यांनी आपल्यावरील वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन त्यांच्याशी गद्दारी केली, अशा शब्दात आव्हाड यांनी शुक्ला यांच्यावर टीका केली. शुक्ला यांनी पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केले आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकाराला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोड दिल्याचे ते पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
बरे, ज्यांच्या बदल्या झाल्या अशांची नावे अतिशय चिल्लर आहेत, इतकी की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. त्यातीलच महादेव इंगोले कोण आहे हे तुम्ही शोधा, तो कुणाशी संबंधित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times