अमरावती : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपानंतर अमरावतीच्या खासदार यांनी लोकसभेतून मुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर खासदार यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. अमरावतीत याचे संतप्त पडसाद उमटले आहेत. आज अमरावतीत नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ युवा स्वाभिमान संघटनेच्या शेकडो महिलांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व अरविंद सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि अरविंद सावंत यांचा निषेध करण्यात आला. ( )

वाचा:

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनात शिवसेनेविरुद्ध रोष उफाळून आला. एका महिला खासदाराचा शिवसेना वारंवार अपमान करत असून शिवसेनेने आमच्या नेत्या नवनीत राणा यांना धमकी देऊ नये, अन्यथा याला चोख प्रत्युत्तर युवा स्वाभिमानच्या महिला देतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी नवनीत राणा यांच्या समर्थनार्थ घोषणा देत अरविंद सावंत यांच्या पोस्टरला काळे फासले व शिवसेनेचा निषेध केला. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांना महिलांनी निवेदन दिले.

वाचा:

नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

मनसुख हिरन हत्या, सचिन वाझे अटक तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले स्फोटक पत्र या सर्वाच्या अनुषंगाने ठाकरे सरकारच्या भूमिकेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तेच प्रश्न मी संसदेत उपस्थित केले. एक महिला खासदार या नात्याने महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मी संसदेत आवाज उठवला. त्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेच्या लॉबीत मला धमकी दिली. “तू महाराष्ट्रात कशी फिरते मी पाहतो. तुलाही जेलमध्ये टाकू”, अशा शब्दात त्यांनी मला धमकावलं, असा नवनीत राणा यांचा आरोप आहे. यापूर्वी शिवसेनेच्या लेटरहेडवर, फोनवर माझ्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची आणि जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे, असा आरोपही राणा यांनी केलेला आहे. आता ज्या प्रकारे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा फक्त माझा अपमान नाही तर माझ्यासह संपूर्ण देशातील महिलांचा अपमान आहे. त्यामुळे खासदार सावंत यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली असून तसं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृहमंत्रालय, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री आणि दिल्ली पोलीस आयुक्तांना लिहिले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here