अमरावती: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे रोजगारनिर्मितीत अमरावती जिल्ह्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. सन २०२०-२१ या वर्षात अमरावती जिल्ह्यात ९६ लक्ष ५१ हजार मनुष्यदिन रोजगारनिर्मिती झाली आहे. पालघर जिल्ह्यात ४६ लक्ष ६९ हजार मनुष्यदिन, तर गोंदिया जिल्ह्यात ४५ लक्ष ९८ हजार मनुष्यदिन निर्मिती होऊन ते अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. ( ranks first in in in the state)

गेल्यावर्षी करोनाचे संकट उद्भवल्यानंतर लॉकडाऊन झाले. शहरांत अनेक कामे बंद झाल्याने नागरिक गावोगाव परतले. यामुळे मेळघाटसह ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. या काळात स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करण्यात ‘’ने मोलाची भूमिका बजावली.

ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची गरज लक्षात घेऊन जलसंधारण, रस्तेविकासाच्या कामांना गती देण्यात आली. गावपातळीवरील कामाची गरज व त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्यात आल्या. या नियोजनात शेततळे, ढाळीचे बांध, वनतळे, वृक्षलागवड, रोपवाटिका, घरकुल, सिंचन विहीर, सार्वजनिक विहीर अशा अनेक कामांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे गेल्या एप्रिलपासून मोठी रोजगारनिर्मिती व्हायला सुरुवात झाली, असे रोहयो उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ९६.५१ लक्ष मनुष्यबळदिन निर्मिती झाली. या योजनेत मजुरीवाटप आदी कामे वेळेत केल्याने खर्चातही जिल्हा आघाडीवर राहिला. या योजनेत २४० कोटी ६१ लाख ५१ हजार खर्च करण्यात आले आहेत. करोना रोगसाथ लक्षात घेऊन एप्रिलपासून अधिकाधिक रोजगारनिर्मितीवर भर देण्यात आला.

क्लिक करा आणि वाचा-
एप्रिलमध्ये सुरुवातीला दैनिक मजूर उपस्थिती १९ हजार ३४६ होती. तीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती मे महिन्यात ९६ हजार ९३० एवढी झाली. आता विविध योजनांची मनरेगाशी सांगड घालून अभिसरणातून कामे राबविण्यात येणार असल्याचेही लंके यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here